index
अनुक्रमणिका
रथ भिमाचा
ताल : केरवा (बाली उमर ने मेरा हाल कर दिया)
धुरा खांद्यावरती घेवू चला रे
रथ हा पुढे पुढे नेवू चला रे ॥धृ॥
गटातटाला विसरूनी जाऊ
विखुरलेले एक होवू चला रे ॥१॥
शब्द भिमबाचे मनी कोरूनिया
नारा भिमबाचा देवू चला रे ॥२॥
आजवर जे घडले विसरूनी जा रे
सकाळ निळी ती पाहु चला रे ॥३॥
घरटे भिमबाचे पुन्हा बांधण्याला
प्राणपणाला लावू चला रे ॥४॥
कविनंदा दयानंदा जागवू जगाला
विजयाचा निळा झेंडा लावू चला रे ॥५॥
↑ वर जा
गृहत्याग
गृहत्यागाला कारण ठरले
शाक्य कोलीया दोन्ही
बोलले रोहिणीचे पाणी ॥१॥
कपिलवस्तु शुद्धोधनाला
सोडले राहुल यशोधरेला
अनाथ झाला कंथक घोडा,
अश्रू वाहिले नयनी ॥२॥
शाक्य कोलीयाचा संघर्ष
गौतमाच्या अंतरी स्पर्श
दुःखमुक्त होईल कैसे,
माघार घेईना कोणी ॥३॥
राजपाठ सोडुनी सारा
त्यागला तो मोह पसारा
दयानंदा सर्वस्व त्यागूनी
सिद्धार्थ निघाले वणी ॥४॥
↑ वर जा
संविधान बोलू लागले
संविधान भारताचे ते बोलू लागले
वर्णवादा जातीवादा तुडवू लागले
एका एका माणसाला घडवू लागले
सत्तेचे कुलपे आता खोलू लागले
जयभिम बोलू लागले ॥ ध्रु ॥
अठरा विश्व दारिद्र्य आमच्या घरी
सत्ता श्रीमंती पुंजीवाद्याच्या दारी
कालचे आंधळे आता डोलू लागले ॥१॥ सत्तेचे…
त्रिशरण पंचशीला देतो जगाला
गरज आहे माझी येणाऱ्या युगाला
माझ्यामुळे शासन हे चालू लागले ॥२॥
कविनंदा दयानंदा आम्ही छावे सिंहाचे
निडर झालो आता ना भय कुणाचे
भले भले आमच्यापुढे लोळू लागले ॥३॥ सत्तेचे...
↑ वर जा
बेईमान लेकर
अवनी ओसरी फिरत होते साहेब झालं मोठं
मुखात जयभिम देव्हारी देव करतात कामहे खोटं
माया भिमाले झाले बेईमान कहिक लोक ॥धृ॥
याले नेश्याले नव्हती लंगोटी धड
माया भिमामुळे अंगात आलं बळ
मांगले दिवस भुलून गेला घेत नाही कोणाची गोठ ॥१॥
याची आंधळी भावना फिरते साऱ्या ह्या जत्रा
देते रोटाची पंगत बोलावते दोस्त मित्रा
कापून कोंबडं नवसं करते हरामाची सारी नोट ॥२॥
बुद्धविहारी हा कधीच जात नाही
पंचशील हा खक्कुन पाळत नाही
कविनंदा हे सांगे दयानंदा, समाजाचं दुःख मोठं ॥३॥
↑ वर जा
No comments:
Post a Comment