भिमविचार डोक्यात
100 Songs Interactive Ebook
अस खळखळ वाहते या पाणी रान शिवारात
तसं सळसळ वाढू द्या भिमविचार डोक्यात ॥१॥
तुमची लाचारी घालवाया उभा केला हा संघर्ष
त्या संघर्षामुळेच, आम्ही साधला उत्कर्ष
आता राजा लोळतोया- धन दौलत नोटात ॥१॥
मागतल्याने भिक मिळते अधिकार नाही
एक संघ होऊनी, करा दिल्लीवर चढाई
अरे इशारा तुम्हाला, त्या भिमाच्या बोटात ॥२॥
ओझ चळवळीच हे, दयानंदा घ्या खांद्यावर
कविनंदा भवितव्य, नाहीतर येईल वांद्यावर
खूणगाठ तुम्ही बांधा या काळजाच्या देठावर ॥
भिमाचा वाघ
(हमे तो लूट लिया मिल के हुस्न वालों ने)
भिमाच्या विचाराचा छोटासा मी वाघ आहे
निळा निळा बाग आहे, भिमाचा मी वाघ आहे ॥धृ॥
भिमाने आम्हासाठी जिवन सारे झिजविले
ज्ञानाचे भांडार आम्हासाठी रिझविले
अशा त्या शुरवीर नागाचा मी नाग आहे ॥१॥
निळ्या निळ्या बागेचे रक्षण आम्ही करणारे
भिमाच्या नावासाठी रणांगणी लढणारे
त्या धगधगत्या क्रांतीची मी आग आहे ॥२॥
मी नातू कविनंदा दयानंदाचा
खंदा पाईक आहे भिमरायाचा
उद्याच्या विकासाचा बुलंद आवाज आहे ॥३॥