Tuesday, March 24, 2026

दयानंद इंगळे - संपूर्ण गीत संग्रह

काव्य-संग्रह: कवी दयानंद इंगळे

भिमविचार डोक्यात

अस खळखळ वाहते या पाणी रान शिवारात तसं सळसळ वाढू द्या भिमविचार डोक्यात ॥१॥ तुमची लाचारी घालवाया उभा केला हा संघर्ष त्या संघर्षामुळेच, आम्ही साधला उत्कर्ष आता राजा लोळतोया- धन दौलत नोटात ॥१॥ मागतल्याने भिक मिळते अधिकार नाही एक संघ होऊनी, करा दिल्लीवर चढाई अरे इशारा तुम्हाला, त्या भिमाच्या बोटात ॥२॥ ओझ चळवळीच हे, दयानंदा घ्या खांद्यावर कविनंदा भवितव्य, नाहीतर येईल वांद्यावर खूणगाठ तुम्ही बांधा या काळजाच्या देठावर ॥
↑ इंडेक्सकडे जा

माहेरची आठवण

स्मरणात राहती माझ्या क्षणोक्षणी माझ्या 'माहेरच्या आठवणी' ।।धृ।। समोर 'बुद्ध विहार', त्याचे मोठे हे द्वार रुबाबाने डोले ऐसे पिंपळाचे झाड बाजूला साक्ष देते गढी ती जुनी ।।१।। गावाच्या खालती असे बौद्धवाडा घरा घरांवरती लहरे झेंडा निळा सकाळी सकाळी गाती भिमाची गाणी ।।२।। सांजच्या पायरी घेती बुद्ध वंदना उपासिका गाती रोज ओव्या पाळणा विहारात जाती रोज आनंदांनी ।।३।। जयंतीचा सोहळा कविनंदी आगळा गौतम कविनंदा आला न्यावया मला दयानंदाची गाणी ओठी जयंती दिनी ।।४।।
↑ इंडेक्सकडे जा

राजे व्हा

अरे जागे व्हा अरे जागे व्हा भिमाच्या लेकरांनो उद्याचे राजे व्हा ।।धृ।। गुलामी तुमच्या दारात आली कळत नाही का तुम्हाला गटातटात विखुरले तुम्ही, वळत नाही का तुम्हाला धागे व्हा एकीचे धागे व्हा ।।१।। शिक्षण आरक्षण बंद केले जातीवादी सरकार बंद केले तुमचे त्यांनी हक्क आणि ते अधिकार ताजे व्हा मुर्दाड नका राहू - उद्याचे राजे व्हा ।।२।। कविनंदा दयानंदा लिहावे क्रांतीचे गाणे बाबा भिमाने दाखविलेल्या मार्गाने तू जाणे वाघ व्हा डरकाळी फोडा - उद्याचे राजे व्हा ।।३।।
↑ इंडेक्सकडे जा

सर्व गाणी यशस्वीरित्या समाविष्ट केली आहेत.

No comments:

Post a Comment