Tuesday, March 24, 2026

भीम विचार - काव्य संग्रह

गीत संग्रह

भिमविचार डोक्यात
अस खळखळ वाहते या पाणी रान शिवारात तसं सळसळ वाढू द्या भिमविचार डोक्यात ॥१॥ तुमची लाचारी घालवाया उभा केला हा संघर्ष त्या संघर्षामुळेच, आम्ही साधला उत्कर्ष आता राजा लोळतोया- धन दौलत नोटात ॥१॥ मागतल्याने भिक मिळते अधिकार नाही एक संघ होऊनी, करा दिल्लीवर चढाई अरे इशारा तुम्हाला, त्या भिमाच्या बोटात ॥२॥ ओझ चळवळीच हे, दयानंदा घ्या खांद्यावर कविनंदा भवितव्य, नाहीतर येईल वांद्यावर खूणगाठ तुम्ही बांधा या काळजाच्या देठावर ॥
↑ परत इंडेक्सकडे
भिमाचा वाघ (चाल: हमे तो लूट लिया...)
भिमाच्या विचाराचा छोटासा मी वाघ आहे निळा निळा बाग आहे, भिमाचा मी वाघ आहे ॥धृ॥ भिमाने आम्हासाठी जिवन सारे झिजविले ज्ञानाचे भांडार आम्हासाठी रिझविले अशा त्या शुरवीर नागाचा मी नाग आहे ॥१॥ निळ्या निळ्या बागेचे रक्षण आम्ही करणारे भिमाच्या नावासाठी रणांगणी लढणारे त्या धगधगत्या क्रांतीची मी आग आहे ॥२॥ मी नातू कविनंदा दयानंदाचा खंदा पाईक आहे भिमरायाचा उद्याच्या विकासाचा बुलंद आवाज आहे ॥३॥
↑ परत इंडेक्सकडे
देशाचा धनी (चाल: छोड दे सारी दुनिया...)
देवूनी चाललो या देशाला धनी संविधाना विना नाही वाली कुणी समता स्वातंत्र्य न्याय बंधुभाव दिसे संविधानामध्ये सामाविले असे करा रक्षण तयाचे मी राहील ऋणी ॥१॥ घरटे एकीचे बाळांनो तोडू नका मी दिलेले हे शब्द तुम्ही मोडू नका तुमचा मालक आता हे ठरावे तुम्ही ॥२॥ जाती जातीच्या नावाने भांडू नका मायभूमीवर रक्त हे सांडू नका टाका मोडून घातक रूढी ती जुनी ॥३॥ आजवर ना दयानंदा कुणी दिले कवीनंदा भिमाने जे आम्हा दिले सांगा चळवळ भिमाची ह्या गाण्यातूनी ॥४॥
↑ परत इंडेक्सकडे

No comments:

Post a Comment